Khanapur

अधिकाऱ्यांवर चांगल्याच भडकल्या आ. डॉ. अंजली निंबाळकर !

Share

 खानापुरात शनिवारी झालेल्या महर्षी वाल्मिकी जयंतीच्या पूर्वतयारीच्या बैठकीत . डॉ. अंजली निंबाळकर शासकीय अधिकाऱ्यांवर चांगल्याच भडकल्या. शासकीय कामात रस घेऊन निष्ठेने काम करा अशी ताकीद त्यांनी यावेळी अधिकाऱ्यांना दिली.

होय, आपल्या कार्यतत्परतेमुळे आणि कर्तव्यकठोरपणामुळे आ. अंजली निंबाळकर चांगल्याच परिचित आहेत. शनिवारी वाल्मिकी जयंतीच्या पूर्वतयारीच्या बैठकीत पुन्हा एकदा याची झलक दिसून आली. महापुरुषांची जयंती साजरी करण्याची जबाबदारी एक आमदार म्हणून मी घेऊ शकते. पण सरकारी कार्यक्रमात सरकारी अधिकारी आपली जबाबदारी का उचलत नाहीत असा सवाल त्यांनी केला. २ वर्षे कोरोनाच्या नावाखाली तुम्ही दरबार मांडलाय.

तालुका पातळीवर आमदारांनी सांगितल्यावरच सगळे कार्यक्रम होतात. अमृत महोत्सवी स्वातंत्र्यदिनी ध्वजवंदन सोडले तर दुसरे काय होते? ठरल्याप्रमाणे सरकारी कार्यालयांवर रोषणाईही केली नव्हती. अतिशय नीरस वाटावा असा तो दिवस ठरला. खरेतर स्वातंत्र्यदिन प्रत्येकासाठी अभिमानाचा, आनंदाचा पण अधिकाऱ्यांच्या चुकीमुळे तो सर्वानाच निराशादायक ठरला असे खडे बोल आ. अंजली निंबाळकर यांनी यावेळी सुनावले.

यावेळी वाल्मिकी समुदायाचे तालुकास्तरीय नेते, तहसीलदार रेश्मा तालिकोटी, खानापूर नगरपंचायतीचे अध्यक्ष मजहर खानापूरी,   उपाध्यक्षा लक्ष्मी अंकलगी, तापं एईओ, समाज कल्याण आणि अन्य खात्यांचे अधिकारी उपस्थित होते.

 

 

Tags: