स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त बेळगावात गांधी जयंतीदिनी आज कायदा साक्षरता अभियान राबवण्यात आले.

जिल्हा कायदा सेवा प्राधिकरण, बेळगाव वकील संघ आणि जिल्हा प्रशासनाच्या वतीने शनिवारी जिल्हा न्यायालय आवारात कायदा साक्षरता अभियानांतर्गत जथा काढण्यात आला. त्याला जिल्हाधिकारी महांतेश हिरेमठ यांनी हिरवे निशाण दाखवून चालना दिली. यावेळी जिल्हा कायदा सेवा प्राधिकरणाचे सदस्य सचिव विजय देवराज अरस यांच्यासह अनेक वकील, मान्यवर उपस्थित होते. 
कोर्ट आवारातून सुरु झालेला हा जथा संगोळ्ळी रायण्णा चौकातून वंटमुरी कॉलनीपर्यंत काढण्यात आला. यावेळी जनतेत कायद्याबाबत जागृती करण्यात आली.


Recent Comments