भरपाई मिळण्यास विलंब झाल्याने निराश झालेल्या शेतकऱ्याने पोलिसांसमोरच विषप्राशन केल्याची घटना विजापूर जिल्ह्यात घडली आहे.

विजापूर जिल्ह्यातील मुद्देबिहाळ परिसरातील एपीएमसी समोर झालेल्या या घटनेत श्रीशैल शंकराप्पा पालीकार या शेतकऱ्याने आत्महत्येचा प्रयत्न केला आहे.
१९७३ साली भू सुधारणा कायद्यांतर्गत एपीएमसीने संपादित केलेल्या जमिनीची भरपाई न मिळाल्याने निराश झालेल्या शेतकऱ्याने विषप्राशन केले. आपल्याला भरपाई मिळावी यासाठी या शेतकऱ्याने सर्व प्रयत्न केले. परंतु अद्याप या शेतकऱ्याला भरपाई न मिळाल्याने विषप्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. मुद्देबिहाळ पोलिसांच्या समोरच या शेतकऱ्याने विषप्राशन केले.
मुद्देबिहाळ पोलीस स्थानकाच्या व्याप्तीत सदर घटना घडली असून श्रीशैल पालीकार या शेतकऱ्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.


Recent Comments