Dharwad

धर्मांतर विरोधी कायदा अंमलात आणा : हिंदू जागरण वेदिकेची मागणी

Share

राज्यात अनेक चर्चमध्ये हिंदू धर्मियांचे धर्मानंतर करण्यात येत आहे, असा आरोप करत हुबळी येथील हिंदू जागरण वेदिकेने आंदोलन छेडले. राज्यात धर्मानंतर विरोधी कायदा अंमलात आणावा, असा आग्रह करत वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी निदर्शने केली.

 

हुबळी येथील रेल्वे स्थानक मार्गावरील डॉ. बी. आर. आंबेडकर सर्कलपासून तहसीलदार कचेरीपर्यंत निघालेल्या या निषेध मोर्चात राज्याती त्वरित धर्मांतर विरोधी कायदा जारी करण्याचा आग्रह करत तहसीलदारांना निवेदन सादर करण्यात आले.

 

यावेळी धारवाड जिल्हा हिंदू जागरण वेदिकेचे प्रधान सचिव संतोष कठारे बोलताना म्हणाले, राज्यात ख्रिश्चन समाजाकडून धर्मानंतर करण्याचा प्रयत्न होत आहे. आरोग्यासह इतर अनेक गोष्टींचे आमिष दाखवून निष्पाप नागरिक आणि दलित नागरिकांना धर्मांतर करण्यासाठी सांगितले जात आहे. बाबासाहेबांनी बनविलेल्या संविधानात सर्वांना सामान हक्क आहेत. प्रत्येकजण स्वतंत्र आहे. परंतु अजूनही लोकांना गुलामगिरीत ठेवावे, या उद्देशाने धर्मांतर करण्यात येत असून, सरकारने वेळीच याप्रकरणी दखल घेऊन धर्मांतर विरोधी कायदा जारी करावा, आणि राज्यात शांतता आणि सुव्यवस्था राखावी, अशी मागणी मागणी केली.

 

या आंदोलनात वेदिकेचे शहर अध्यक्ष गणेश जितुरी, प्रधान सचिव विश्वनाथ बुडून, कार्यदर्शी मंजुनाथ जाधव आदींसह इतर कार्यकर्ते सहभागी झाले होते.

Tags: