कृषिमंत्री बी. सी. पाटील यांची कालची भेट केवळ राजकीय स्वरूपाची होती. या भेटीत त्यांनी ना ही शेतकऱ्यांच्या समस्या ऐकल्या ना ही काही ठोस आश्वासन दिले असा आरोप चिक्कोडी जिल्हा रयत संघटनेचे अध्यक्ष राजू पोवार यांनी केला आहे.

कोरोना संकट, लॉकडाउन, अतिवृष्टी, महापूर अशा अनेक संकटांचा सामना शेतकरी करत आहेत. या पार्श्वभूमीवर कृषिमंत्री बी. सी. पाटील निपाणी तालुका दौऱ्यात शेतकऱ्यांच्या डोळ्यातील अश्रू पुसतील अशी अपेक्षा होती. मात्र ती फोल ठरली आहे. त्यांचा दौरा हा केवळ राजकीय स्वरूपाचा होता अशी टीका राजू पोवार यांनी शेतकऱ्यांच्या बैठकीत केला. एपीएमसी-नगरपालिकेमधील पार्किंगच्या मुद्यावरून वाद, पीक नुकसान अशा शेतकऱ्यांचा अनेक समस्या होत्या. त्यावर कृषिमंत्री बी. सी. पाटील यांनी काहीच भाष्य केले नाही असे ते म्हणाले.
यावेळी रयत संघाचे निपाणी तालुका अध्यक्ष आय. एन. बेग, निपाणी शहराध्यक्ष उमेश भारमल, कार्याध्यक्ष प्रवीण सुताले, ग्रामीण अध्यक्ष सदानंद नागराळे, कलगोंडा कोट्टे, मालगोंडा मिर्जी, युवा अध्यक्ष बाळासाहेब हर्डीकर तसेच रयत संघाचे सदस्य उपस्थित होते.


Recent Comments