Banglore

मृत्युंजय स्वामीजी-मुख्यमंत्र्यांची भेट

Share

 लिंगायत पंचमसाली समुदायाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी लढा पुकारलेले कुडलसंगम पीठाचे बसवजय मृत्युंजय स्वामीजी यांनी आज अचानक मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांची भेट घेतल्याने कुतूहल निर्माण झाले आहे.

होय, बसवजय मृत्युंजय स्वामीजी यांनी शुक्रवारी सकाळी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांची भेट घेऊन काही काळ चर्चा केली. लिंगायत पंचमसाली समुदायाला २-ए आरक्षण मिळावे या संदर्भात उभयतात महत्वाची चर्चा झाल्याचे समजते. यावेळी  बसवजय मृत्युंजय स्वामीजी यांनी मुख्यमंत्र्यांचा शाल घालून सत्कार केला. याप्रसंगी सार्वजनिक बांधकाम मंत्री सी. सी. पाटील, माजी आ. एच. एस. शिवशंकर आदी उपस्थित होते.

Tags: