अथणी येथे कनकदास समाजाच्या समुदाय भवनाच्या कामकाजाचा पायाभरणी समारंभ आमदार महेश कुमठळ्ळी यांच्या हस्ते पार पडला.

अथणी येथील ‘कनकभवन’ या कनकदास समाजाच्या समुदाय भवनाचा पायाभरणी समारंभ नुकताच पार पाडला. या पायाभरणी समारंभाच्या सर्व विधी आमदार महेश कुमठळ्ळी यांच्याहस्ते पार पाडण्यात आल्या. (फ्लो)
कार्यक्रमानंतर बोलताना आमदार महेश कुमठळ्ळी म्हणाले, सरकारने माझ्यावर सोपविलेली जबाबदारी मी प्रामाणिकपणे पार पडण्याचा प्रयत्न करेन. सुमारे ५० लाखांच्या अनुदानातून कनकभवन उभारण्यात येत असून मी आणि उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांच्या नेतृत्वाखाली अधिकाधिक अनुदान मिळवून देण्यासाठी प्रयत्न करेन. या समाजासह इतर समाजाच्या विकासासाठी मी प्रयत्नशील आहे, असे वक्तव्य महेश कुमठळ्ळी यांनी केले.
यावेळी युवा नेते चिदानंद सवदी बोलताना म्हणाले, अथणीचे आमदार महेश कुमठळ्ळी यांच्या प्रयत्नातून कनकदास भवनसाठी ५० लाख रुपयांचे अनुदान मिळाले आहे.या समाजाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी आपण प्रामाणिक प्रयत्न करू. कनकदास हे केवळ एकाच जातीपुरते मर्यादित नसून सर्व समाजासाठी ते एक आदर्श आहेत. त्यांची तत्वे ही सर्वांसाठी आदर्शवत आहेत, समुदाय भवनाच्या उभारणीसाठी धर्मनिरपेक्ष आणि निःपक्षपाती प्रयत्न करू, असा भरवसा सवदी यांनी दिला.
पायाभरणी कार्यक्रमाला रमेशगौड पाटील, मल्लेश हुद्दार, सुरेश मायाण्णावर, संगप्पा ऐनापुरे, बाबू मेंडिगेरी, सुरेश इचारी आदींसह इतर मान्यवर आणि नागरिक उपस्थित होते.


Recent Comments