बेळगाव स्मार्ट सिटी लि. च्या वतीने स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त बेळगावात शुक्रवारी सायकल जथा काढण्यात आला.

‘फ्रीडम तो सायकल, सायकलिंग टुवार्डस हेल्थ’ या घोषवाक्यासह शुक्रवारी सकाळी किल्ला तलावाजवळील अशोक सर्कलपासून सायकल फेरी काढण्यात आली. जिल्हाधिकारी महांतेश हिरेमठ यांनी हवेत फुगे सोडून फेरीला चालना दिली.
त्यानंतर संगोळ्ळी रायण्णा चौकमार्गे राणी चन्नम्मा चौकापर्यंत सायकल जथा काढण्यात आला. यावेळी आ. अनिल बेनके, जिल्हाधिकारी महांतेश हिरेमठ, डीसीपी पी. स्नेहा, स्मार्टसिटीचे एमडी प्रवीण बागेवाडी यांच्यासह अनेक अधिकारी सायकल चालवत फेरीत सहभागी झाले हे विशेष.
यावेळी बोलताना जिल्हाधिकारी महांतेश हिरेमठ म्हणाले, स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त काढलेल्या या सायकल फेरीत २ क्लबचे ७५हुन अधिक सायकलपटू सहभागी झाले आहेत. सायकलिंग हे आरोग्याला सहायक ठरते. त्यामुळे सर्वानी सायकल चालवून आपले आरोग्य उत्तम ठेवावे असे आवाहन केले.
एकंदर स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त जिल्हा प्रशासनाकडून विविध समाजोपयोगी कार्यक्रमांचे आयोजन करून देशाच्या स्वातंत्र्यासाठी योगदान दिलेल्या स्वातंत्र्यसैनिकांचे स्मरण केले जातेय ही चांगली बाब आहे.


Recent Comments