बेळगाव ग्रामीणच्या आ. लक्ष्मी हेब्बाळकर यांच्याबाबत अवमानास्पद वक्तव्य केल्याने माजी आ. संजय पाटील यांच्यावर समाजमाध्यांतून टीकेचा भडीमार होत आहे.

आ. लक्ष्मी हेब्बाळकर या लोकांना चंद्र-तारे देण्याचे आमिष दाखवून राजकारण करतात असे सांगतानाच माजी आ. संजय पाटील यांनी आ. हेब्बाळकर यांच्यावर अवमानास्पद भाषेत टीका केली होती. त्याबद्दल संजय पाटील यांच्यावर संपूर्ण राज्यातून टीका होत आहे. काँग्रेसच्या राज्यस्तरीय नेत्यांसह सामान्य कार्यकर्ते आणि जनतेतून संजय पाटील यांच्यावर सोशल मीडियावर टीकेची राळ उडवण्यात येत आहे.
भाजप हा आरएसएसचा समर्थित पक्ष. त्यामुळे आरएसएस महिलांचा असा अवमान करायचे प्रशिक्षण देते का? महिलांबद्दल जराही सौजन्य न दाखविता भाजप नेते बोलतात. त्यामुळे यातून त्यांची तालिबानी मानसिकता दिसून येते. एकीकडे भारतमाता कि जय म्हणता मग भारतमातेलाही अशीच वागणूक देता का? भाजपनेत्यांनी आधी सभ्य बोलणे आणि संस्कृती शिकून घ्यावी असा टोला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिनेश गुंडूराव यांनी हाणला आहे. याशिवाय कर्नाटक काँग्रेससह कार्यकर्ते आणि जनतेतूनही संजय पाटील यांच्यावर सोशल मीडियावर टिकाप्रहार करण्यात येत आहेत.


Recent Comments