बंधू संजय पाटील यांनाही आई, पत्नी, मुली आहेत. त्यांनी माझ्याबद्दल केलेले विधान कोणाला लागू पडते याचे त्यांनी आत्मावलोकन करावे असे बेळगाव ग्रामीणच्या आ. लक्ष्मी हेब्बाळकर यांनी म्हटले आहे.

बेळगावात शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना आ. लक्ष्मी हेब्बाळकर म्हणाल्या, बंधू संजय पाटील यांनाही आई, पत्नी, मुली आहेत. त्यांनी माझ्याबद्दल केलेले विधान कोणाला लागू पडते याचे त्यांनी आत्मावलोकन करावे. त्यांचे हे विधान वैयक्तिक आहे की पक्षाची भूमिका आहे हे भाजप प्रदेशाध्यक्ष नलिनकुमार कटील आणि मुख्यमंत्री बोम्मई यांनी स्पष्ट करावे अशी मागणी त्यांनी केली.
तुमची प्रगती बघवत नसल्याने संजय पाटील यांनी ते विधान केले का या प्रश्नावर, मी विकासकामांच्या माध्यमातूनच त्यावर उत्तर देईन असे आ. हेब्बाळकर म्हणाल्या.
संजय पाटील यांनी माझ्या विरोधात कितीही विधाने, वक्तव्ये केली तरी मी त्यांना प्रतिक्रया देणार नाही. त्यांनी समोर येऊन आरोप केले तरी त्यांना मी घाबरणारी नाही. लोकांसोबत राहून लोकांसाठीच मी काम करत राहीन. आगामी दिवसात लोकच त्यांना काय ते उत्तर देतील असा विश्वास आ. हेब्बाळकर यांनी व्यक्त केला.
एकंदर संजय पाटील यांच्या आरोपांना आ. लक्ष्मी हेब्बाळकर यांनी अतिशय थंडपणे प्रतिक्रिया दिली आहे. एकप्रकारे त्यांनी संजय पाटील याना आव्हानच दिले आहे. यावर आता भाजपचे राज्यस्तरीय नेते काय भूमिका घेतात हे बघायला हवे.


Recent Comments