Khanapur

गोधोळी येथील सीसी रस्त्याचे आमदार निंबाळकर यांच्याहस्ते भूमिपूजन

Share

खानापूर तालुक्यातील गोधोळी गावातील अल्पसंख्यांक कॉलनीतील सीसी रस्त्याच्या कामकाजाचा शुभारंभ खानापूर आमदार डॉ. अंजलीताई निंबाळकर यांच्याहस्ते भूमिपूजनाने करण्यात आले.

गोधोळी गावातील अल्पसंख्यांक कॉलनीमध्ये अल्पसंख्यांक विभागाच्या वतीने २१ लाख २५ हजार इतक्या खर्चातून रस्ते कामकाजाला प्रारंभ करण्यात आला. रस्ते कामकाज भूमिपूजनाचा शुभारंभ आमदार अंजलीताई निंबाळकर यांच्याहस्ते करण्यात आला.यावेळी ख्रिश्चन बांधवांची भेट घेऊन आमदारांनी चर्चा केली. तसेच गावातील विविध समस्या, अंगणवाडी नूतन इमारत, गावातील रस्ते यासह इतर विषयांवर ग्रामस्थांच्यावतीने पिडिओंच्या उपस्थितीत चर्चा करण्यात आली. यावेळी ग्रामपंचायत अध्यक्ष, सर्व सदस्यांनी अंजलीताई निंबाळकर यांचा सत्कार केला.

Tags: