आगामी विधानपरिषद निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षातर्फे मला उमेदवारी दिल्यास मी निवडणूक लढविण्यास तयार आहे, असे वक्तव्य माजी खासदार प्रकाश हुक्केरी यांनी केले.

चिकोडी तालुक्यातील एकसंबा गावात प्रसारमाध्यमांशी बोलताना माजी खासदार प्रकाश हुक्केरी म्हणाले, मागील ३५ वर्षांपासून मी लोकप्रतिनिधी म्हणून जनतेची सेवा करत आहे. काँग्रेस मधील एक ज्येष्ठ नेता आहे. १९८८ पासून विधानपरिषद सदस्य म्हणून काम करण्याचा अनुभव माझ्याकडे असून काँग्रेस हायकमांड आणि राज्याचे वरिष्ठ नेते सिद्धरामय्या, डी. के. शिवकुमार तसेच सतीश जारकीहोळी यांच्यासह काँग्रेस नेत्यांनी मला विधानपरिषद निवडणूक लढविण्यासाठी संधी द्यावी.
जनतेनेही प्रकाश हुक्केरी यांनी विधानसभा निवडणूक लढवावी अशी मागणी केली आहे. त्यामुळे मी आगामी विधानपरिषद निवडणूक लढविण्यास सज्ज आहे, असे प्रकाश हुक्केरी म्हणाले.


Recent Comments