Khanapur

इटगी गावात तालुकास्तरीय पोषण मास

Share

खानापूर तालुक्यातील इटगी गावात तालुकास्तरीय पोषण मासानिमित्त . डॉ. अंजली निंबाळकर यांच्याहस्ते पौष्टिक आहार शिबीर, अन्नप्राशन आणि भाग्यलक्ष्मी बॉण्ड्स वितरण आदी कार्यक्रमांचे उदघाटन करण्यात आले.

खानापूर तालुक्यातील इटगी गावात तालुकास्तरीय पोषण मासाचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचे तसेच अन्य कार्यक्रमांचे या निमित्त आ. डॉ. अंजली निंबाळकर यांच्याहस्ते उदघाटन करण्यात आले. यावेळी महिलांसाठी रांगोळी स्पर्धा, खाध्यपदार्थ तयार करण्याची स्पर्धा आदी कार्यक्रम घेण्यात आले. यावेळी मुलांचे वाढदिवसही साजरे करण्यात आले. महिलांनी आकर्षक रांगोळ्या काढून आणि विविध चविष्ट खाध्यपदार्थ बनवून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. यावेळी लहान मुलांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले.  याप्रसंगी महिला व बालकल्याण तसेच विविध खात्यांचे अधिकारी, इटगी व परिसरातील गावच्या महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. 

 

Tags: