बलवान देह आणि मन आरोग्यपूर्ण जीवनासाठी आवश्यक आहे असे मत मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी व्यक्त केले.

जागतिक हृदय दिनानिमित्त बेंगळुरात बुधवारी सकाळी विधानसौधपासून कंठीरव क्रीडांगणापर्यंत ‘हृदयापासून बंधुभाव वाढवू’ या सूत्रांतर्गत वाल्केथॉनचे आयोजन करण्यात आले होते. त्याला चालना देऊन मुख्यमंत्री बोलत होते. ते म्हणाले, जागतिक हृदय दिनानिमित्त वेगाने चालण्याच्या उपक्रमाला चालना देण्यात आली आहे. माणसाला आरोग्यपूर्ण राहण्यासाठी वेगाने चालण्याचा व्यायाम नियमित केला पाहिजे.
मानवी शरीरातील सर्व अवयवांत हृदय हा एक प्रमुख अवयव आहे. प्रत्येकाला हृदयघातावर करावयाच्या प्राथमिक उपचारांची माहिती असणे गरजेचे आहे. ६०% अकाली मृत्यूंपैकी २५% मृत्यू हृदयघाताने होतात. ते टाळण्यासाठी वेगाने चालण्याचा व्यायाम हा सर्वोत्तम उपाय आहे. राज्यातील जनतेने वेळेत वेळ काढून रोज नित्यनेमाने व्यायाम किमान वेगाने चालण्याचा व्यायाम करावा असे आवाहन मुख्यमंत्री बोम्मई यांनी केले.
याप्रसंगी आरोग्यमंत्री डॉ. के. सुधाकर, खा. पी. सी. मोहन, जिल्हाधिकारी मंजुनाथ आदी उपस्थित होते.


Recent Comments