पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिनानिमित्त ‘सेवा ही समर्पण‘ अभियानांतर्गत चिक्कोडी जिल्हा भाजप रयत मोर्चातर्फे हुक्केरी तालुक्यातील बडकुंद्री गावात हिरण्यकेशी नदीच्या काठावर स्वच्छता मोहीम राबवण्यात आली.

चिक्कोडी जिल्हा भाजप रयत मोर्चाचे अध्यक्ष सत्याप्पा नाईक यांच्या नेतृत्वाखाली ही स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. भाजप चिक्कोडी जिल्हाध्यक्ष डॉ. राजेश नेर्ली, मारुती अष्टगी, रयत मोर्चा सरचिटणीस महावीर नाशिपुडी, दरेप्पा ठकण्णावर, शेखरगौडा मोदगी, हनुमंत इनामदार, हुक्केरी मंडळ अध्यक्ष राचय्या हिरेमठ, रयत मोर्चाचे मंडळ अध्यक्ष रवी हिडकल तसेच रयत मोर्चा, युवा मोर्चाच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी या स्वच्छता मोहिमेत भाग घेतला. 


Recent Comments