जलसंपदा मंत्री गोविंद कारजोळ यांच्या विरोधात माजी मंत्री आणि सध्याचे आमदार एम. बी. पाटील यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. भाजप सरकार हे पापी आणि अनैतिक सरकार असल्याची टीकाही एम. बी. पाटील यांनी केली आहे.

जलसंपदा मंत्री गोविंद कारजोळ यांच्यावर आमदार एम. बी. पाटील यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. युकेपी योजनेत काँग्रेसने पाप केले असल्याचे वक्तव्य गोविंद कारजोळ यांनी केले होते. या वक्तव्यावर एम. बी. पाटील यांनी प्रत्त्युत्तर दिले असून गोविंद कारजोळ हे पापी मंत्री असल्याची टीका आमदार पाटील यांनी केली.
सिद्धरामय्या यांना सध्या ट्रोल करण्यात येत असल्याच्या मुद्द्यावर बोलताना त्यांनी हे चिल्लर काम असल्याचे म्हटले आहे. आज सिद्धरामय्या ट्रोल होत आहेत उद्या येडियुरप्पा यांना ट्रोल केले जाईल, कदाचित मलाही ट्रोल केले जाईल… हे ट्रोल करण्यासारखे विषय नसून अशा विषयांवर निष्फळ चर्चा करणे चुकीचे आहे, अशी प्रतिक्रिया एम. बी. पाटील यांनी व्यक्त केली.


Recent Comments