कुंपणात बेकायदा सोडलेल्या विजेचा धक्का लागून युवकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना विजापूर जिल्ह्यातील देवरहिप्परगी तालुक्यातील चट्टरकी गावात घडली.

चिक्करूगी गावचा रहिवाशी ३० वर्षीय बिरप्पा चंद्रप्पा रोट्टी असे मृत युवकाचे नाव आहे. तो सिंदगी येथील सरकारी इस्पितळात स्टाफ नर्स म्हणून काम करत होता. चट्टरकी गावच्या हद्दीत येणाऱ्या मल्लिनाथ बसवंत कत्तळ्ळी आणि मुत्तप्पा बसाप्पा बसप्पगोळ यांच्या शेतातील मका पिकाच्या रक्षणासाठी म्हणून कोणतीही खबरदारी न घेता शेताभोवती तारेचे कुंपण बांधून त्यात हेस्कॉमच्या मुख्य वीजवाहिन्यांवरून थेट वीजप्रवाह सोडून दिला होता. सोमवारी दुपारी बिरप्पा रोट्टी हा शेतातून जाताना त्याच्या पायाला विजेचा धक्का बसला आणि तो जागीच गतप्राण झाला. देवरहिप्परगी पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद झाली आहे.


Recent Comments