Nippani

निपाणीत पुन्हा घरफोडी; दागिने; १० हजार लांबवले

Share

 निपाणी परिसरात चोऱ्यांचे सत्र सुरूच आहे. शहरातील साखरवाडीतील एका घरात कोण नसल्याचे पाहून चोरटयांनी १० हजार रुपये रोख आणि सोन्याच्या दागिन्यांवर डल्ला मारून पोबारा केल्याची घटना उघडकीस आली आहे.

निपाणी शहराजवळील साखरवाडीतील सुनंदा आनंद साळूंके यांचे बंद घर फोडून चोरटयांनी चोरी केली. साळूंके कुटुंबीय नातेवाईक आजारी असल्याने त्यांना पाहण्यासाठी घरला कुलूप लावून परगावी गेले होते. ही संधी साधून चोरटयांनी त्यांच्या घराचे कुलूप फोडून घरात प्रवेश करून २० ग्राम वजनाचे सोन्याचे दागिने आणि १० हजार रुपये रोख असा ऐवज लांबवला. याबाबत सुगंद आनंद साळुंके यांनी अधिक माहिती दिली.

याप्रकरणी निपाणी पोलीस ठाण्यात चोरीची तक्रार नोंदवण्यात आली आहे. दरम्यान, वाढत्या चोऱ्यांमुळे निपाणी परिसरातील नागरिकांत भीती पसरली असून पोलिसांनी बंदोबस्त वाढवून चोरट्यांवर नियंत्रण मिळवावे अशी मागणी केली जात आहे.

 

Tags: