सिंदगी पोटनिवडणुक घोषणेच्या पार्श्वभूमीवर खासदार रमेश जिगजीनगी यांनी असमाधान व्यक्त केले आहे. भाजप जिल्हा कार्यकारिणी सभेत व्यासपीठावरून बोलताना त्यांनी समाधानाचे सूर व्यक्त केले असून पक्षाने निवडणुकीसंदर्भात माझ्याशी कोणताही संपर्क साधला नसल्याचे ते म्हणाले.

राज्यप्रधान कार्यदर्शी महेश टेंगिनकाई यांच्याशी रमेश जिगजीनगी बातचीत करत होते. यावेळी त्यांनी ही नाराजी व्यक्त केली आहे. निवडणुकीसंदर्भात माझा अभिप्राय पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांपर्यंत पोहोचावा. लोकसभा सदस्य या नात्याने माझ्यावर पक्षाने जबाबदारीचे काम सोपवणे गरजेचे होते. सिंदगी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गोंधळ निर्माण झाला असून या गोष्टीचा आपल्याला त्रास होत आहे. अशा शब्दात जिगजिनगी यांनी नाराजी व्यक्त केली. ()
जिगजीनगी पुढे म्हणाले, आतापर्यंत मी पक्षविरोधात कधीही कार्य केले नाही. पक्षविरोधात कोणतेही विधान केले नाही. माझे आता वय झाले असून कार्यकर्त्यांसमवेत कार्यकर्त्याप्रमाणेच मी राहीन, माझी गरज नसल्यास माझ्या समक्ष हे जाहीरपणे सांगावे, असेही जिगजीनगी म्हणाले.


Recent Comments