व्याजाने दिलेले ५ हजार रुपये आणि ऑटोरिक्षाचा डेली रिपोर्ट व्यवस्थित न दिल्याने केलेल्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या रिक्षाचालकाचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी जुनी हुबळी येथे घडली.
जुन्या हुबळीतील नका नगरातील चव्हाण प्लॉटमधील रहिवासी असलेल्या लोकेश नामक रिक्षाचालकाला खासगी सावकारी करणाऱ्या मारुती नामक एकाने व्याजाने ५ हजार रु दिले होते. त्याशिवाय रिक्षाचा रोजचा २०० रु. रिपोर्टही लोकेशन मारुतीला द्यायचा होता. यावरून काळ या दोघांमध्ये भांडण झाले होते. त्यावेळी मारुतीने आणखी ४-५जणांना घेऊन येत लोकेशवर हल्ला चढविला होता असा आरोप लोकेशच्या भावाने व कुटुंबीयांनी केला आहे. गंभीर जखमी अवस्थेतील लोकेशला उपचारांसाठी किम्स हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारांचा उपयोग न होता त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी जुनी हुबळी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. हल्लेखोरांच्या शोधासाठी पोलीस कसून तपास करत आहेत.
Recent Comments