फेसबुक फ्रेंड्स क्लबच्या वतीने खानापूर तालुक्यातील ८ शाळांच्या ग्रंथालयांना ऑपरेशन मदत अंतर्गत पुस्तके भेट देण्यात आली.

फेसबुक फ्रेंड्स क्लबच्या वतीने मंगळवारी बेळगावातील कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या सभागृहात झालेल्या कार्यक्रमात डीसीपी डॉ. विक्रम आमटे यांच्याहस्ते खानापूर तालुक्यातील ८ शाळांच्या ग्रंथालयांना पुस्तके भेट देण्यात आली. यावेळी बोलताना डॉ. आमटे यांनी फेसबुक फ्रेंड्स क्लबच्या, ऑपरेशन मदत उपक्रमाचे कौतुक केले.
खानापूर तालुक्यातील दुर्गम जंगल प्रदेशातील शाळांना पुस्तके भेट देऊन विधार्थ्यांची सोय केल्याबद्दल प्रशंसा करावी तेवढी कमीच आहे. त्यांचे हे कार्य असेच सुरु रहावे अशा शुभेच्छा त्यांनी दिल्या. याप्रसंगी कॅन्टोन्मेंट बोर्डाचे सीईओ आनंद के., ज्येष्ठ समाजसेवक शिवाजी कागणीकर, बेळगाव शहर केंद्र ग्रंथालयाचे उपसंचालक रामय्या, भूपेंद्र पटेल, एम. वाय. तालुकर, राहुल पाटील, संतोष दरेकर, प्रसाद हुली, रमेश लद्धड, प्रशांत मिर्जी, किरण निपाणीकर, सुनील कुलकर्णी आदी उपस्थित होते. 


Recent Comments