Vijayapura

इच्छुक उमेदवाराच्या घरासमोर करणीबाधेचे साहित्य

Share

 समाज कितीही शिकला, सवरला तरी अंधश्रद्धा त्याची पाठ सोडत नाही याची प्रचिती देणारी घटना विजापुरात घडली आहे. चक्क एका इच्छुक उमेदवाराच्या घरासमोर करणीबाधेचे साहित्य ठेवल्याचे उघड झाल्याने खळबळ माजली आहे.

होय, विजापूर जिल्ह्यातील सिंदगी विधानसभा मतदार संघातील पोट निवडणुकीची सध्या धामधूम सुरु आहे. भाजपतर्फे निवडणूक लढविण्यास शिवानंद पाटील-सोमजाळ हे इच्छुक आहेत. त्यांच्या सिंदगीतील बंडाळ रस्त्यावरील घरासमोर एका मडक्यात लिंबे आणि करणीबाधेसाठी वापरले जाणारे साहित्य लाल फडक्यात बांधून ठेवल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. आज सकाळी १० च्या सुमारास घरातील कामगारांनी हा प्रकार पाहून पाटील याना याची माहिती दिली.

एकंदर २१व्या शतकातही अन तेही निवडणुकीच्या संदर्भातही असे करणीबाधा करण्याचे प्रकार पाहून आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

 

Tags: