केंद्र सरकारच्या शेतकरी कायद्याविरोधात आज अनेक शेतकरी संघटनांनी भारत बंदची हाक दिली आहे. अनेक पुरोगामी संघटना आणि काँग्रेस किसान मोर्चाने हा बंद पुकारला आहे. या बंदला आज विजापूर जिल्ह्यात संमिश्र प्रतिसाद मिळाल्याचे पाहावयास मिळाले. दरम्यान नेहमीप्रमाणे बस, आऑटोरिक्षा, दुकाने आणि इतर व्यवसाय सुरु असल्याचेही निदर्शनास आले.

विजापूर जिल्ह्यातील हॉटेल व्यवसाय आणि बेकरीसह सर्व व्यवसाय नेहमीप्रमाणे आज सुरु होते. सकाळपासून पावसामुळे काही दुकाने उशिरा उघडली. पावसामुळे विखुरलेल्या मोर्चातील किसान काँग्रेस आंदोलकांनी विजापूर शहरातील आंबेडकर चौकात पावसातच निदर्शने केली. मोर्चाच्या पार्श्वभूमीवर विजापूर एपीएमसी मधील भाजी विक्री, फळविक्री आदी व्यवसाय देखील बंद ठेवण्यात आले होते. काही अंशी आपले व्यवहार बंद पडलेल्या व्यापारी, दुकानदारांनी आणि शेतकऱ्यांनी आजच्या भारत बंद ला पाठिंबा दिला आहे.
शेतकरी संघटना, पुरोगामी संघटना आणि काँग्रेस किसान मोर्चाने पुकारलेल्या भारत बंद ला पाठिंबा देण्याचे आवाहन केले. भारत बंद च्या पार्श्वभूमीवर विजापूर जिल्ह्यातील अक्कमहादेवी विशवविद्यालयाच्या परीक्षाही पुढे ढकलण्यात आल्या असून बंद मुळे विद्यार्थ्यांना कोणतीही अडचण होऊ नये यासाठी बीएड विद्यार्थ्यांच्या परीक्षा उद्यावर ढकलण्यात आल्या आहेत.
पदवी, पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना पुढे ढकलण्यात आलेल्या परीक्षांचे वेळापत्रक लवकरच कळविण्यात येईल, अशी माहिती अक्कमहादेवी विश्वविद्यालयाच्या मूल्यमापन विभागाच्या कुलसचिवांनी दिली आहे. या आंदोलनात कोणताही अनुसूचित प्रकार घडू नये, यासाठी कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.


Recent Comments