केंद्राच्या कृषी कायद्याविरोधात विविध शेतकरी संघटनांनी आज भारत बंद ची हाक दिली होती. या पार्श्वभूमीवर हुक्केरी तालुक्यातील विविध गावातील शेतकऱ्यांनी शहरातील कोर्ट सर्कल नजीक आंदोलन छेदत सरकारचा निषेध नोंदवला.

व्हॉइस : या आंदोलनातील युवा रयत नेते प्रशांत अंकलगी प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले, केंद्र सरकारने शेतकरी विरोधी कायदे जारी केले आहेत. केंद्र सरकार दिवसेंदिवस कामगार, गरीब जनता आणि शेतकऱ्यांवर अन्यायाचे अस्त्र उगारत आहे. दिवसेंदिवस अन्नधान्याचे दर वाढत चालले आहे. याविरोधात आवाज उठविण्यासाठी हुक्केरी शहरात आंदोलन छेडण्यात आले आहे. अशाचपद्धतीने केंद्रसरकार धोरण अवलंबत असल्यास यापुढील काळात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा अंकलगी यांनी दिला.
आंदोलनावेळी आंदोलनकर्त्यांनी मानवी साखळी बनवून रस्त्यावर उतरून आपला आक्रोश व्यक्त केला. काँग्रेस अल्पसंख्यांक घटकचे अध्यक्ष शानूल तहसीलदार यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. शेतकरी विरोधी धोरण सरकारने मागे घ्यावे, अन्यथा येणाऱ्या काळात राज्य आणि केंद्र सरकार उलथवून टाकण्यात येईल. पेट्रोल आणि डिझेल तसेच जीवनावश्यक दरांच्या वाढत्या किंमतीविरोधातही तहसीलदार यांनी आक्रोश व्यक्त केला.
गुरु मडीवाळ या शेतकरी नेत्यानेही सरकारविरोधात नाराजी व्यक्त केली. केंद्र आणि राज्य सरकारने पिकांची निश्चित किंमत जाहीर करावी, उसाला प्रतिटन चार हजार रुपये दर द्यावा, शेतकऱ्यांच्या समस्यांना सरकारने प्रतिसाद द्यावा, अन्यथा शेतकरी संघटन मजबूत होऊन देशपातळीवर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा मडीवाळ यांनी दिला.
भारत बंदला हुक्केरीत अनेक ठिकाणी समर्थन मिळाले नाही. कोविड नंतर उद्भवलेल्या परिस्थितीमुळे आणि आठवड्याचा पहिलाच दिवस असल्याने अनेक ठिकाणी दुकाने, व्यवसाय तसेच शाळा, महाविद्यालये नेहमीप्रमाणे सुरु असल्याचे निदर्शनास आले.
या आंदोलनात विविध शेतकरी संघटना तसेच काँग्रेस नेते प्रशांत अंकलगी, शानूल तहसीलदार, कबीर मलिक, राजू शिदनाळ, गोपाळ मरबसन्नवर, बसवराज ग्यालगोळ, प्रकाश मगदूम, उमेश मगदूम, मारुती चिक्कोडी, मलिक देसाई, सलीम कळावंत आदींसह अनेकजण या आंदोलनात सहभागी झाले होते.


Recent Comments