यूपीएससी परीक्षा पास होण्यासाठी कठोर मेहनत घ्यावी लागते. ही परीक्षा पास होणे प्रत्येकाच्या आवाक्यातील गोष्ट नाही. आपल्या कठोर मेहनतीच्या आणि जिद्दीच्या जोरावर विजापूर जिल्ह्यातील नेत्रा मेटी या विद्यार्थिनीने हे यश संपादन करत विजापूरचे नाव झळकवले आहे.

: विजापूर जिल्ह्यातील नेत्रा मेटी या विद्यार्थिनीने यूपीएससी परीक्षेच्या अभ्यासक्रमाचे धडे गिरवत विजापूर जिल्ह्याचे नाव उंचावले आहे. ३२६व्या रँक ने नेत्रा यूपीएससी परीक्षा पास झाली असून तिच्या या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे. विजापूर जिल्ह्यातील अलमट्टी येथील रहिवासी नेत्रा मेटी ही निवृत्त एसबीआय कर्मचारी भालचंद्र मेटी यांची द्वितीय कन्या आहे. अलमट्टी संगम नर्सरी शाळेत नेत्राचे इयत्ता पहिली ते चौथी पर्यंतचे शिक्षण झाले असून इयत्ता पाचवी ते पीयूसी द्वितीय वर्षापर्यंतचे शिक्षण विजापूर जिल्ह्यातील पीडीजे शाळेत झाले आहे. त्यानंतर बेंगळूर येथील बीएएमएससीई या महाविद्यालयात नेत्राने इलेक्ट्रॉनिकस अँड कम्युनिकेशन या अभ्यासक्रमातील इंजिनियरिंग पदवी प्राप्त केली असून पदवी प्राप्त केल्यानंतर बेंगळूर येथील मर्सिडीज बेंझ च्या रिसर्च अँड डेव्हलपमेंट विभागात तीन वर्षे काम केले आहे. दरम्यान नेत्राने युपीएएससी परीक्षेचा ध्यास घेऊन कोचिंग क्लास जॉईन करत अभ्यासक्रमाला सुरुवात केली. बेंगळूरमधील २ संस्थांमध्ये प्रशिक्षण घेऊन नेत्राने यूपीएससीची परीक्षा दिली असून या परीक्षेत ३२६ व रँक तिने प्राप्त केला आहे. 
नेत्राची मोठी बहीण बेंगळूरमधील अमेझॉन कंपनीत कार्यरत आहे. तर लहान बहीण अनुषा ही हुबळी येथील किम्स मध्ये एमबीबीएसचे शिक्षण घेत आहे. नेत्राच्या आई वडिलांनी नेत्राला युपीएससीसाठी भरपूर पाठिंबा दिला असून आपल्या मुलींनी शिक्षणाची इच्छा आपल्याकडे व्यक्त केल्यास आपण त्यांना नकार दिला नसल्याचे नेत्राचे वडील सांगतात.
निरंतर प्रयत्न आणि दृढ संकल्प करून आपण आपल्याला हवे ते यश संपादन करू शकतो. सध्या आपल्या मुलीने जशी युपीएएससी परीक्षा पास केली आहे त्याचप्रमाणे आयएएस किंवा आयएफएस हुद्द्यासाठी प्रयत्न करावेत, अशी आपली इच्छा आहे, असे मत नेत्राची आई अक्कम्म मेटी यांनी व्यक्त केले.


Recent Comments