Athani

अथणीत शेतकऱ्यांचे भव्य आंदोलन

Share

केंद्र सरकारच्या कृषी धोरणाविरोधात तसेच दरवाढीविरोधात शेतकरी संघटनांनी पुकारलेल्या भारत बंद च्या पार्श्वभूमीवर अथणी येथे शेतकऱ्यांनी मोठया प्रमाणात आंदोलन छेडले.

शहरातील बसवेश्वर सर्कलपासून सुरु झालेला निषेध मोर्चा आंबेडकर चौकच्या दिशेने मार्गस्थ झाला. आंबेडकर चौकात आल्यावर आंदोलकांनी मानवी साखळी करून केंद्र आणि राज्य सरकारविरोधात घोषणा देत निदर्शने केली. या आंदोलनात गॅस दरवाढीविरोधात शेतकरी महिलांनी केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. अथणी तहसीलदार कार्यालयाजवळ हा मोर्चा आल्यानंतर तहसीलदार दुंडाप्पा कोमार यांना निवेदन सादर करण्यात आले.

या आंदोलनावेळी रयत नेते महादेव मडीवाळ यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. केंद्र सरकारने जारी केलेल्या तीन कायद्यांविरोधात गेल्या दहा महिन्यांपासून आंदोलन छेडण्यात येत आहे. या कायद्याच्या निषेधार्थ आज भारत बंद ची हाक देण्यात आली आहे. भारत बंदच्या पार्श्वभूमीवर आज अथणीत शेतकरी संघटना आणि विविध संघटना एकत्रित येऊन केंद्र सरकारच्या विरोधार्थ आंदोलन करण्यात येत आहे, असे मडीवाळ म्हणाले. भारत बंदच्या पार्श्वभूमीवर आंदोलनकर्त्यांसह आमचे प्रतिनिधी राकेश यांनी केलेली बातचीत आपण पाहुयात …. अथणी येथे झालेल्या या निषेध आंदोलनात विविध रयत संघटनांसह इतर संघटना सहभागी झाल्या होत्या.

 

Tags: