मृत्यूनंतरही काही लोक आपल्या कार्याच्या रूपात अमर राहतात. दिवंगत सुरेश अंगडी हे त्यापैकीच एक. आपल्या व्यक्तिमत्वाने त्यांनी सर्वांची मने जिंकून घेतली होती असे सांगत मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सुरेश अंगडी यांच्या आठवणींना उजाळा दिला.

बेळगावातील अंगडी इन्स्टिटयूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट संस्थेत सुरेश अंगडी एज्युकेशनल फौंडेशनच्या वतीने सुरेश अंगडी यांची पहिली पुण्यतिथी आणि पुतळा अनावरण समारंभाला मान्यवर आणि स्वामीजींच्या उपस्थितीत चालना दिल्यावर ते बोलत होते.
मुख्यमंत्री म्हणाले, सुरेश अंगडी यांच्या प्रगतीत त्यांची आई आणि पत्नीचे मोठे योगदान आहे. त्यांच्या घरी गेल्यावर गरमागरम भाकरीचे जेवण त्या देत. उत्तर कर्नाटक आणि हिंदुत्वाविषयी सुरेश अंगडी यांना अपार अभिमान होता. ते उत्तर कर्नाटकाचा आवाज होते. ते एक अजातशत्रू लोकनेते होते. त्यांनी पाहिलेले बेळगाव-धारवाड थेट रेल्वे मार्गाचे काम पूर्ण करण्यासाठी राज्य सरकार हवे ते सहकार्य देईल. त्याचप्रमाणे बेळगाव-बेंगळूर एक्स्प्रेस रेल्वेला सुरेश अंगडी यांचे नाव देण्याची शिफारस राज्य सरकार कडून करण्यात येईल असे आश्वासन त्यांनी दिले. 
यावेळी बोलताना जलसंसाधन मंत्री गोविंद कारजोळ म्हणाले, सुरेश अंगडी हे समाजाला जाणारे सोबत घेऊन जाणारे राजकारणी होते. त्यांच्या कार्याची पताका पुढील अनेक वर्षे फडकत राहील. त्यांचे समाजकार्य त्यांच्या कुटुंबीयांनी आणि कार्यकर्त्यांनी पुढे सुरु ठेवावे असे आवाहन त्यांनी केले. बाईट
माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर म्हणाले, सुरेश अंगडी आणि इराण्णा कडाडी यांनी जिल्हाध्यक्ष म्हणून केलेल्या अहर्निश प्रयत्नांमुळेच भाजप आज जिल्ह्यात बळकट झाला आहे. सुरेश अंगडी यांनी केंद्र सरकारमध्ये केवळ एकच वर्षात रेल्वे राज्यमंत्री म्हणून केलेले कार्य त्यांच्या इच्छाशक्तीची प्रचिती देते. त्यांच्या प्रयत्नातून स्मार्ट सिटी योजनेतूनच बेळगावातील रस्त्यांची स्थिती आज सुधारल्याचे दिसून येते. या कार्यक्रमाला राज्यातील अनेक स्वामीजींची उपस्थिती होती. त्याशिवाय मंत्री उमेश कत्ती, शंकर पाटील-मुनेनकोप्प, भैरत्ती बसवराज, माजी राज्यसभा सदस्य प्रभाकर कोरे, माजी खा. प्रकाश हुक्केरी, माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी, विधान परिषदेचे मुख्य प्रतोद महांतेश कवटगीमठ, आ. अनिल बेनके, आ. अभय पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.


Recent Comments