Nippani

नदीकाठी येऊन अडकलेल्या गणेशमूर्तींचे पुन्हा विसर्जन

Share

 निपाणीजवळील यमगर्णी येथे नदीकाठी येऊन अडकलेल्या विसर्जित गणेशमूर्तींचे वीरुपाक्षलींग समाधी मठाचे श्री प्राणलिंग स्वामीजींच्या नेतृत्वाखाली पुन्हा विधिवत विसर्जन करण्यात आले.

निपाणी परिसरातील गणेशमूर्तींचे वेदगंगा नदीत विसर्जन करण्यात आले होते. परंतु नदीची पाणीपातळी कमी झाल्याने या मूर्ती वाहून न जाता यमगर्णीजवळ नदीपात्रात काठाला अडकून पडल्या होत्या. याची माहिती मिळताच मठाच्या कार्यकर्त्यांनी श्रीराम सेना हिंदुस्तानच्या नेत्यांशी चर्चा करून गणेशभक्तांसह या मूर्तींचे वीरुपाक्षलींग समाधी मठाचे श्री प्राणलिंग स्वामीजींच्या नेतृत्वाखाली पुन्हा विसर्जन करण्यात आले. श्रीमूर्तींचा अवमान होऊ नये यासाठी ४००हुन अधिक श्रीमूर्तींचे प्राणलिंग स्वामीजींनी पुन्हा विसर्जन केले.यावेळी, प्राणलिंग स्वामीजींनी केवळ ५-११ दिवस प्रतिष्ठापना करून गणेशमूर्तींचे विसर्जन केले कि झाले असे न समजता, श्रीमूर्तींचे व्यवस्थित विसर्जन झाले की नाही हे पाहिले पाहिजे, प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्ती लवकर विसर्जित होत नाहीत, विरघळत नाहीत. त्यामुळे मातीपासून बनवलेल्या श्रीमूर्तींचीच प्रतिष्ठापना केली पाहिजे असे सांगितले.

 

 

Tags: