Crime

गोकाकमध्ये शेतमजूर महिलेवर मालकाकडून बलात्कार

Share

 राज्यात महिला अत्याचाराची प्रकरणे वाढत असतानाच बेळगाव जिल्ह्यातही त्याचे लोण पसरले आहे. गोकाक येथे एका शेतमजूर महिलेवर शेतमालकानेच बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे.

होय, शेतात कामास असलेल्या मजूर महिलेवर शेताच्या कामांध मालकानेच बलात्कार केल्याची घटना १७ सप्टेंबरच्या रात्री घडली आहे. याबाबत पीडित महिलेने गोकाक पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. ही महिला आणि तिचा पती गेल्या वर्षभरापासून शेतात शेतगडी म्हणून रहात आहेत. आता तिचा पती घरी नसल्याचे पाहून शेतमालकाने तिच्यावर बलात्कार केला आहे. गोकाक पोलिसांनी शेतमालकाला अटक केली आहे. कालच विधिमंडळ अधिवेशनात राज्यातील महिलांवरील वाढत्या अत्याचारांसंदर्भात व्यापक चर्चा झाली होती. पण केवळ चर्चा करण्याने काही होणार नाही, अत्याचाऱ्यांना कठीणात कठोर शिक्षा करावी अशी मागणी होत आहे.

 

Tags: