खानापूरच्या आ. डॉ. अंजली निंबाळकर यांनी ऊर्जामंत्री सुनीलकुमार यांची भेट घेऊन खानापूर तालुक्यातील वीज समस्येवर चर्चा केली.

होय, खानापूर तालुक्याला भेडसावणाऱ्या वीजटंचाईच्या समस्येसंदर्भात आ. अंजली निंबाळकर यांनी ऊर्जामंत्री सुनीलकुमार यांची भेट घेऊन चर्चा केली. तालुक्यातील कोडचवाड येथे ११० केव्ही सबस्टेशन उभारणी, हलशी आणि बैलूर येथे प्रत्येकी ३३ केव्हीचे सबस्टेशन आणि ट्रान्सफॉर्मर दुरुस्ती केंद्र सुरु करावे अशी मागणी त्यांनी ऊर्जामंत्र्यांकडे केली.
त्याला सकारात्मक प्रतिसाद देत ऊर्जामंत्री सुनीलकुमार यांनी कोडचवाड येथे ११० केव्ही सबस्टेशन उभारण्यासाठी लवकरच निविदा मागविण्यात येतील. त्याचप्रमाणे हलशी आणि बैलूर येथे प्रत्येकी ३३ केव्हीचे सबस्टेशन उभारण्यासाठी १-२ दिवसात निविदा मागविण्यात येतील असे आश्वासन दिल्याचे आ. अंजली निंबाळकर यांनी सांगितले.


Recent Comments