Belagavi

आ. लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या विरोधात बॅनर वॉर !

Share

 बेळगाव ग्रामीण मतदारसंघात . लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या विरोधात बॅनर वॉर सुरु झाले आहे. नादुरुस्त रस्त्यांचा दाखल देत काही अज्ञातांनी त्यांच्याविरोधात ठिकठिकाणी उपहासात्म मजकुराचे बॅनर्स लावून त्यांची टर उडवली आहे.

होय, आ. लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या नावाचा कुठेही उल्लेख न करता केवळ अक्का असा शब्द वापरून कन्नड, मराठी भाषेतील हे व्यंगात्मक फलक उचगाव, तारिहाळ बेळगाव रस्त्यावर लावण्यात आले आहेत. ‘कुकर घ्या, साडी घ्या, मताचा लिलाव करा,’ ‘घ्या आता पैसे, द्या मते,’ ‘मत दिल्याचा बोनस म्हणून तुम्हाला मिळेल रस्त्यातील खड्डे, पडून पाय मोडून घ्या,’ ‘३०% कमिशन घेऊन अक्का रस्ते करतात, म्हणून रस्ते होतात, मग बोंबलत बसा,’ ‘अक्का पैसे घेऊन फार्मवर जातात, तुम्ही पाय मोडून घेऊन घरी बसा’ असा उपहासात्मक, व्यंगात्मक मजकूर या फलकांवर लिहिलेला आहे. खराब रस्ते आणि डोक्याला हात लावून बसलेल्या व्यक्तीचे छायाचित्र या फलकांवर आहे. येणा-जाणारे लोक थांबून हे फलक वाचून जात आहेत. ग्रामीण भागातील खराब रस्त्यांची अवस्था पाहून कोणी अज्ञातांनी हे फलक लावून संताप व्यक्त केला आहे. आता यावर आ. लक्ष्मी हेब्बाळकर काय पवित्रा घेतात याबाबत कुतूहल निर्माण झाले आहे.

 

 

 

 

Tags: