विजापूर जिल्हा दुष्काळ पीडित म्हणूनच कुप्रसिद्ध आहे. तरीही येथील शेतकरी हवामान पोषक असल्याने तूर डाळीचेच उत्पादन अधिक घेतात. मात्र आता या पिकावर रोग पसरला असून, त्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. याबाबत पेश आहे एक रिपोर्ट …
होय, विजापूर जिल्हा सतत दुष्काळपीडित म्हणूनच ओळखला जातो. कधी येथे अतिवृष्टीने तर कधी अनावृष्टीने पिकांचे नुकसान होते. आता येथी तूर पिकाला रोगाने ग्रासल्याने हातातोंडाशी आलेले पीक वाया गेले आहे. बाईट
यावर्षी रब्बी हंगामात विजापूर जिल्ह्यात एकूण ६.८ लाख हेक्टर प्रदेशात पेरण्या करण्यात आल्या असून त्यापैकी ४.५ हेक्टर जमिनीवर तूर पिकाची पेरणी करण्यात आली आहे. मात्र या पिकाला आता रोगाने ग्रासले आहे. दरवर्षी तेच-तेच पीक घेतल्याने ही समस्या उदभवली आहे. क्रॉप रोटेशन न केल्यामुळेच तुरीवर रोग आल्याचे सहायक कृषी संचालक राजशेखर विलियर्ड्स यांनी सांगितले. हा रोग दिसून आल्याच्या २-३ दिवसांतच रोगग्रस्त रोपे नष्ट केल्याने या रोगावर नियंत्रण मिळवणे शक्य आहे. याबाबत शेतकऱ्यांना माहिती देण्यासाठी एक समिती स्थापन केली आहे असे त्यांनी सांगितले.
एकंदर, दरवर्षीच विजापूर जिल्ह्यातील शेतकरी एक ना अनेक समस्येला बळी पडतात. सरकार आणि कृषी खात्याने संयुक्तपणे त्यांच्या समस्यांवर कायमस्वरूपी तोडगा शोधावा हीच आमची अपेक्षा. विजयकुमार सारवाड, आपली मराठी, विजापूर


Recent Comments