Accident

नदी ओलांडण्याचा प्रयत्नात एकजण वाहून गेला

Share

 

विजापूर जिल्ह्यात सर्वत्र होत असलेल्या संततधार पावसामुळे नदीनाले दुथडी भरून वाहात आहेत. डोणी नदीला आलेल्या पुरात नदी ओलांडण्याचा प्रयत्नात एकजण वाहून गेल्याची घटना घडली

विजापूर जिल्ह्यातील तालिकोटी शहरातील ५० वर्षीय इब्राहिम बेपारी असे वाहून गेलेल्या व्यक्तीचे नाव आहे. दुथडी भरून वाहाणारी डोणी नदी पार करण्याच्या प्रयत्नात तो अचानक वाहून गेला आहे. इब्राहिम बेपारी हा मोटारसायकलवरून हाडगीनाळहुन तालिकोटीला जात होता. त्यावेळी नदी भरू वाहात असल्याने एका किनाऱ्यावर त्याने मोटरसायकल थांबवली आणि दुसऱ्या किनाऱ्यावर चालत जाण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी अचानक तो पाण्यात वाहून गेला. याची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या जवानांनी व पोलिसांनी धाव घेऊन त्याचा शोध घेतला. पण बेपारी आढळून आला नाही. तालिकोटी पोलीस ठाण्यात घटनेची नोंद झाली आहे.

 

Tags: