राज्यभरात गाजलेल्या विजापूर जिल्हा इस्पितळातील अर्भक विक्री प्रकरणाचा अखेर सुखांत झाला आहे. विकलेले बाळ हुबळीच्या किम्स इस्पितळात सापडले असून, त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत.
होय, केवळ ८ दिवसांच्या अर्भकाला आईनेच ५ हजार रु साठी विकल्याचे प्रकरण विजापूर जिल्हा इस्पितळात काहीसे उशिराच उघडकीस आले होते. या प्रकरणाने राज्यात खळबळ उडाली होती. इतकेच नव्हे तर माजी मंत्री एम. बी. पाटील, आ. यशवंतरायगौंडा पाटील यांनी हा मुद्दा विधिमंडळ अधिवेशनातही उपस्थित केला होता. या प्रकरणी विजापूर पोलिसांनी ३ विशेष तपास पथके स्थापन करून वेगाने तपास चालविला होता. अखेर मातेपासून दुरावलेले हे बाळ हुबळीतील किम्स इस्पितळात आढळून आले आहे. त्याची प्रकृती खालावल्याने त्याला विकत घेतलेल्यानी त्याला किम्समध्ये दाखल केले होते. सध्या बळावर अतिदक्षता विभागात उपचार करण्यात येत आहेत. सिंदगी तालुक्यातील एका अपत्यहीन दाम्पत्याने या बाळाला विकत घेतले होते. हे प्रकरण तपासाच्या टप्प्यात असल्याने याबाबत याहून अधिक माहिती देता येणार नसल्याचे विजापूरचे पोलीस अधीक्षक आनंदकुमार यांनी सांगितले. फ्लो
Recent Comments