माणसांपाठोपाठ आता देवांना आणि मंदिर–मठांनाही चोरटे लक्ष करत आहेत. खणदाळ मठात झालेल्या चोरीनंतर आता चोरट्यांच्या नजरेतून देवही सुटेनात म्हणायची वेळ आली आहे.


होय, चिकोडी तालुक्यातील खणदाळ गावातील हुलकांतेश्वर मठात चोरटयांनी चोरी करून देवाच्या चांदीच्या पादुका, सोन्याचे नेत्र, चांदीचे पूजासाहित्य आदींवर डल्ला मारला आहे. हारुगेरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही चोरी करण्यात आली आहे. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. आधी केवळ घरांमध्ये चोरी करणाऱ्या चोरट्याने आता देवांचेही भय राहिले नाही का असा प्रश्न यानिमित्ताने निर्माण झाला आहे.


Recent Comments