Politics

बबलेश्वर तालुक्यातील शेतकऱ्यांचे सिद्रामय्यांना साकडे

Share

अपर कृष्णा प्रकल्पात जमीन गमावणाऱ्या शेतकऱ्यांना एकसमान भरपाई देण्याची मागणी करत विजापूर जिल्ह्यातील बबलेश्वर तालुक्यातील शेतकऱ्यांनी विरोधी पक्षनेते सिद्रामय्या यांची भेट घेऊन निवेदन दिले.

 

माजी मंत्री एम. बी. पाटील यांच्या नेतृत्वाखाली बबलेश्वर तालुक्यातील शेतकऱ्यांनी बुधवारी बेंगळुरात माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते सिद्रामय्या यांची भेट घेतली. यावेळी अपर कृष्णा प्रकल्पात जमीन गमावणाऱ्या शेतकऱ्यांना एकसमान भरपाई देण्याची मागणी त्यांनी केली. यापूर्वी महसूल मंत्री असलेल्या कागोडू तिम्मप्पा यांनी तशी शिफारस केली होती याची आठवण शेतकऱ्यांनी करून दिली. या मुद्द्यांवर सभागृहात चर्चा घडवून न्याय मिळवून देण्याची मागणी त्यांनी सिद्रामय्या यांच्याकडे केली. यावेळी विधान परिषद सदस्य सुनीलगौडा उपस्थित होते.

 

Tags: