कामाचे बिल मंजूर करण्यासाठी ३ टक्के लाचेची मागणी करून लाच स्वीकारताना अथणीच्या ग्रामीण पेयजल आणि निस्सारण मंडळाच्या सहायक कार्यकारी अभियंता आणि व्यवस्थापकाला एसीबीने रंगेहात पकडले.

सहायक कार्यकारी अभियंता राजेंद्र इंद्रप्पा परणाकर आणि व्यवस्थापक दीपक कृष्णाजी कुलकर्णी अशी लाच घेताना पकडण्यात आलेल्या अधिकाऱ्यांची नावे आहेत. एका कंत्राटदाराकडून ६८ हजार रु लाच घेताना एसीबीने त्यांना रंगेहात पकडले. ग्रामीण पेयजल आणि निस्सारण मंडळातर्फे राबवण्यात आलेल्या जलजीवन मिशन योजनेच्या कामाचे बिल मंजूर करण्यासाठी बिलाच्या ३% एवढ्या रकमेची लाच या उभय अधिकाऱ्यांनी एका कंत्राटदाराकडे मागितली होती. त्याबाबत कंत्राटदाराने अँटी करप्शन ब्युरोकडे तक्रार केली होती. त्यानुसार एसीबीने सापळा रचून ही कारवाई केली. एसीबीचे पोलीस अधीक्षक बी. एस. न्यामगौडर यांच्या नेतृत्वाखालची निरीक्षक अडिवेश गुदिगोप्प आणि सुनीलकुमार व कर्मचाऱ्यांनी या कारवाईत भाग घेतला.


Recent Comments