Belagavi

आरएलएसच्या विद्यार्थ्यांचे के-सेटमध्ये यश

Share

बेळगावातील केएलई संस्थेच्या आरएलएस महाविद्यालयाच्या काही विध्यार्थ्यानी कर्नाटक सीईटी परीक्षेत उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे. त्याबद्दल मंगळवारी त्यांचा कॉलेजतर्फे सत्कार करण्यात आला.

आरएलएसचे विध्यार्थी मोहम्मद कैफ मुल्ला याने के-सेट परीक्षेत कॉलेजमध्ये पहिला तर राज्यात पाचवा क्रमांक मिळवला आहे. सोहम चिपरे याने कॉलेजमध्ये दुसरा क्रमांक मिळवला आहे. या कामगिरीबद्दल या विद्यार्थ्यांचा कॉलेज व्यवस्थापन आणि प्राध्यापकांतर्फे त्यांचा गौरव करण्यात आला.

यावेळी बोलताना प्राचार्य बी. सी. कामगोळ यांनी विध्यार्थ्यांच्या या यशाने कॉलेज आणि संस्थेचे नाव उज्ज्वल झाले असून त्याचा प्रशासकीय मंडळ, प्राध्यापकांना अभिमान आहे असे सांगितले.

पहिला रँक मिळवलेल्या मोहम्मद कैफने, आपल्या या यशामागे प्राध्यापकांचे मार्गदर्शन, प्रेरणा कारणीभूत आहे. त्यामुळे त्यांना धन्यवाद देतो असे सांगितले.  दुसरा रँक मिळवलेल्या सोहम चिपरे यानेही प्राध्यापकांचे आभार मानले आणि डॉक्टर होण्याची अभिलाषा व्यक्त केली.

 

यावेळी प्राध्यापक, विध्यार्थी, कर्मचारी उपस्थित होते.

 

Tags: