बेळगावातील महांतेश नगरचे रहिवासी आणि वीरराणी चन्नम्मा संस्थांनचे वंशज जगदीश शिवबसप्पा जकाती हे मृत्यूनंतरही अमर झाले आहेत. त्यांच्या इच्छेनुसार त्यांचे अवयव आणि देह दान करण्यात आला आहे.

तिगडी गावच्या नामवंत घराण्याचे ८५ वर्षीय जगदीश शिवबसप्पा जकाती यांचे आज बेळगावच्या केएलई इस्पितळात निधन झाले. त्यांच्या इच्छेनुसार, त्यांच्या नेत्र, त्वचा आणि देहदान करण्यात आले. त्यांच्या इच्छेनुसार बैलहोंगल येथील डॉ. रामण्णावर चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून बेळगावच्या केएलई इस्पितळाला हे दान करण्यात आले. ट्रस्टचे सचिव डॉ. महांतेश रामण्णावर यांनी यासाठी परिश्रम घेतले. याबाबत डॉ. रामण्णावर चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने जकाती कुटुंबियांचे आभार मानण्यात आले.


Recent Comments