अधिकारांचे विकेंद्रीकरण करण्याच्या दृष्टीने कन्नड व संस्कृती खात्याच्या मंत्र्यांनी राज्याच्या चारही महसुली विभागात संयुक्त संचालक पद निर्माण करण्याचा निर्णय घेऊन तसा आदेश बजावला आहे. त्या पार्श्वभूमीवर बेळगाव महसूल विभाग संयुक्त संचालकपदी बसवराज हुगार यांची नियुक्ती केली असून त्यांनी सोमवारी पदभार स्वीकारला.
बेळगाव विभागाच्या कार्यक्षेत्रात बेळगाव, बागलकोट, विजापूर, हावेरी, गदग, धारवाड, कारवार आणि उत्तर कन्नड या जिल्ह्यांचा समावेश होतो. या जिल्ह्यातील ट्रस्ट, अकादमी, रंगायन, रंगमंदिरे आणि ७ जिल्ह्यांच्या कन्नड व संस्कृती खात्याच्या सहायक संचालकांच्या कामकाजावर देखरेख ठेवण्याची जबाबदारी संयुक्त संचालकांवर आहे. नूतन संयुक्त संचालक बसवराज हुगार मूळचे बागलकोट जिल्ह्यातील सिमुकेरि गावचे असून, त्यांनी याआधी सहायक संचालक म्हणून तुमकूर, कोप्पळ, कारवार, मंड्या, धारवाड आदी जिल्ह्यांत अनेक वर्षे काम केले आहे. त्याशिवाय बेंगळूरच्या ललितकला अकादमीचे रजिस्ट्रार म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे. त्यांच्या साहित्यकृतींना अनेक पुरस्कार लाभले आहेत.



Recent Comments