खानापूर तालुक्यातील नागुर्डा गावच्या जवानाचा पुणे येथे मिल्ट्री हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु असताना निधन झाले.

खानापूर तालुक्यातील नागुर्डा गावचे जवान संतोष नामदेव कोलेकर हे आजारी होते. त्यांच्यावर पुणे येथील मिल्ट्री हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु होते. पण उपचारांचा उपयोग न होता, त्यांचे निधन झाले. ते ३६ वर्षांचे होते. त्यांच्या मागे आई लता, पत्नी कीर्ती आणि ६ वर्षांचा मुलगा आरुष असा परिवार आहे. संतोष यांचा पार्थिव देह आज, सोमवारी दुपारपर्यंत स्वग्राम नागुर्डा येथे आणण्यात येणार आहे. त्यानंतर त्यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.


Recent Comments