बेळगावातील मठ गल्लीतील चिक्कबस्तीमध्ये चातुर्मासानिमित्त दशलक्षण पर्व भक्तिभावाने साजरा करण्यात आला.

भाद्रपद शुक्ल चतुर्थीपासून ते पौर्णिमेपर्यंत दिगंबर जैन धर्मीय दशलक्षण पर्व साजरा करतात. या दहा दिवसांच्या काळात श्रावक-श्राविका पुण्यसंचयासाठी पूजाअर्चा, स्वाध्याय, उपवास व्रत करतात. बेळगावातील मठ गल्लीतील चिक्कबस्तीमध्ये दशलक्षण पर्वानिमित्त हे सर्व विधी पार पाडले. यात गांधीनगर, शेरी गल्ली, कुलकर्णी गल्ली, अनंतशयन गल्ली, बसवण गल्ली आदी परिसरातील ६० हुन अधिक श्रावक-श्राविकानी जपजाप्य, पूजा, ध्यान, प्रार्थना आदी कार्यक्रमात सहभागी होऊन यथाशक्ती उपवास केले. सांगितिक पूजा, अष्टविधान पूजा, विद्वानांची प्रवचने आदी कार्यक्रम १६ दिवस पार पडले.
याबाबत आपली मराठीला अधिक माहिती देताना आराधना महिला मंडळाच्या अध्यक्षा सुरेखा आदिनाथ गोरगोंडा यांनी सांगितले कि, आत्म्याचे स्वरूप समजून घेण्यासाठी दशलक्षण पर्व पाळण्यात येतो. अहिंसा परमो धर्म हे तत्व पाळण्यासाठी होईल तितका त्याग केला पाहिजे. पंतप्रधान मोदीसुद्धा आमच्या या उत्सवात सहभागी झाले. कर्नाटक सरकारनेही शुभेच्छा दिल्या आहेत. अहिंसा परमोधर्म या तत्वाने सर्वांचेच कल्याण होणार आहे.
एकंदर जैन धर्मियांच्या या पवित्र दशलक्षण पर्वात श्रावक-श्राविका भक्तिभावाने सहभागी झाल्याचे यावेळी दिसून आले.


Recent Comments