१७ सप्टेंबरला देशभर राबविण्यात आलेल्या मेगा लसीकरण अभियानात बेळगाव जिल्ह्याने संपूर्ण देशात दुसरा क्रमांक पटकावला आहे. जिल्हाधिकारी महांतेश हिरेमठ यांनी ही माहिती दिली.
होय, शुक्रवारी, १७ सप्टेंबरला देशव्यापी कोरोना प्रतिबंधक मेगा लसीकरण अभियान राबविण्यात आले. त्यात बेंगळूर महानगरपालिकेने अव्वल स्थान पटकावले आहे. बेंगळूर महानगरपालिकेच्या हद्दीत काळ एकाच दिवसात ४,०९,९७७ नागरिकांना लस देण्यात आली. बेळगाव जिल्ह्यात एकाच दिवसात २,५७,६०४ नागरिकांना लस देण्यात आली. वास्तविक बेळगाव जिल्हाभरात एकाच दिवशी ३ लाख नागरिकांना लस देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. हे अपेक्षित उद्दिष्ट गाठता आले नसले तरी दिलेल्या एकूण लशींच्या प्रमाणात बेळगाव जिल्हा देशात दुसऱ्या क्रमांकावर राहिला आहे ही अभिमानास्पद बाब आहे असे जिल्हाधिकारी हिरेमठ यांनी सांगितले. हा गौरव प्राप्त करण्यासाठी योगदान दिलेल्या आरोग्य, महसूल, ग्रामविकास, महिला आणि बाल कल्याण विकास तसेच जिल्ह्यातील स्थानिक स्वराज संस्थांचे जिल्हाधिकाऱ्यांनी आभार मानले.
Recent Comments