अनधिकृतपणे शेतात गांजा पिकविल्याच्या आरोपाखाली कुंदगोळ तालुक्यातील कोप्प बुद्रुक गावातील तिघा शेतकऱ्यांना गुडकेरी पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून ५९ किलो गांजा जप्त करण्यात आला.

कुंदगोळ तालुक्यातील कोप्प बुद्रुक गावातील काही शेतकऱ्यांनी आपल्या शेतात गांजाचे पीक घेतल्याची खबर पोलिसांना मिळाली होती. त्यावरून पीएसआय सविता मुन्याळ यांच्या नेतृत्वाखालील पथकाने छापा टाकून गांजा पीक ताब्यात घेऊन ३ शेतकऱ्यांना अटक केली. यावेळी मालतेश सिंगाप्पा कित्तूर याच्या शेतात ३१ किलो, रुद्राप्पा अडिवप्पा औजारे याच्या शेतात २० किलो, निंगाप्पा कुबेरप्पा करीकेंनानवर यांच्या शेतात ८ किलो ३० ग्राम गांजा जप्त करण्यात आला. दरम्यान, तहसीलदार अशोक शिग्गावी यांनी गांजा पिकवलेल्या शेताला भेट देऊन पाहणी केली.


Recent Comments