देशात कोरोना संसर्गाचे प्रमाण कमी झाल्याने मंदिरे सुरु करण्याची मागणी होत आहे. यासंदर्भात अधिकाऱ्यांशी चर्चा करून निर्णय घेण्यात येईल असे बेळगावचे जिल्हाधिकारी महांतेश हिरेमठ यांनी सांगितले.

: शनिवारी आपल्या कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत जिल्हाधिकारी महांतेश हिरेमठ म्हणाले, जिल्ह्यातील प्रसिद्ध मंदिरे चिंचली मायाक्का, सौंदत्ती यल्लम्मा आदी देवस्थाने भाविकांना खुली करण्याची मागणी करण्यात येत आहे. याबाबत सोमवारी संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून निणर्य घेऊन मंदिर प्रवेश नियमावली तयार करण्यात येईल. एकंदर, कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा फटका बसण्याचा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे. तो लक्षात ठेवूनच मंदिरे खुली करण्याचा निर्णय व्हावा हीच आमची अपेक्षा.


Recent Comments