Belagavi

सरदार्स हायस्कुल लसीकरण केंद्राला जिल्हाधिकाऱ्यांची भेट

Share

बेळगाव जिल्ह्यात आज महालसीकरण अभियान राबवून लाख लोकांचे लसीकरण करण्याचे उद्दिष्ट जिल्हा प्रशासनाने ठेवले आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी महांतेश हिरेमठ यांनी शुक्रवारी शहरातील सरदार्स हायस्कुल लसीकरण केंद्राला भेट देऊन पाहणी केली.

होय, देशात आणि राज्यात शुक्रवारी महालसीकरण अभियान राबवण्यात येत आहे. बेळगाव जिह्यातही ३ लाख लोकांचे लसीकरण करण्याचे उद्दिष्ट जिल्हा प्रशासनाने ठेवले आहे. जिल्ह्यात यासाठी एकूण १२०० लसीकरण केंद्रे स्थापण्यात आली होती. बेळगाव शहरात सरदार्स हायस्कुल आवारात लसीकरण केंद्र स्थापण्यात आले होते. या केंद्राला जिल्हाधिकारी महांतेश हिरेमठ यांनी भेट देऊन पाहणी केली. लस घेण्यासाठी या केंद्रावर लोकांनी रांगा लावल्या होत्या. दुपारच्या सुमारास शेकडा ७२ इतके लसीकरण करण्यात आले. जिल्हाभरात या अभियानात पहिला आणि दुसरा डोस देण्यासह एकूण ३ लाख लोकांचे लसीकरण करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.

 

Tags: