संभाव्य तिसऱ्या लाटेपासून सर्वांचे रक्षण करण्याच्या हेतूने सरकारने आज देशभरात महालसीकरण अभियान राबवले आहे त्याचा सर्वानी लाभ घ्यावा असे आवाहन खा. मंगल अंगडी यांनी केले.
बेळगावात शुक्रवारी सरदार्स हायस्कुल आवारात आयोजित महालसीकरण अभियानाचे उदघाटन केल्यावर बोलताना खा. मंगल अंगडी म्हणाल्या, बेळगाव जिल्ह्यात आज एकाच दिवशी ३ लाख लोकांचे लसीकरण करण्याच्या हेतूने जिल्हाभरात लसीकरण अभियान चालवण्यात येताहे. त्याचा सर्वांनी लाभ घेऊन स्वतःचे रक्षण करावे.
यावेळी बोलताना उत्तरचे आ. अनिल बेनके म्हणाले, सर्वांना मोफत लस देण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे. त्यामुळेच महालसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. कोरोनाविरोधात लढण्यासाठी सध्या केवळ लस हेच एकमेव अस्त्र आहे. त्याचप्रमाणे लस घेतल्यानंतर आपल्याला काही होणार नाही म्हणून कोणी बेपर्वाईही दाखवू नये. मास्क घालणे, सामाजिक अंतर राखणे अशा उपायांचा अवलंब करावा.
याप्रसंगी जिल्हाधिकारी महांतेश हिरेमठ, जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. एस. व्ही. मुन्याळ आदी उपस्थित होते.
Recent Comments