पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जन्मदिन आज देशभरात विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला. त्याचप्रमाणे बेळगावातही तानाजी गल्लीतील श्री रेणुकादेवी मंदिरात महाआरती करून मोदींना शुभेच्छा देण्यात आल्या.

होय, बेळगावातील तानाजी गल्लीतील श्री रेणुकादेवी मंदिरात पंतप्रधान मोदींच्या ७१ व्या जन्मदिनानिमित्त देवीची विशेष पूजा-अर्चा करून महाआरती करण्यात आली. मोदींना दीर्घायुष्य दे अशी प्रार्थना करण्यात आली. यावेळी मोदी यांच्या समर्थकांनी केक कापून त्यांचा वाढदिवस साजरा केला. फ्लो
यावेळी रेणुकादेवी देवस्थानचे ट्रस्टी राहुल मुचंडी, वसंतराव हलगेकर, सूरज गायकवाड, विनोद पुजारी, राम कटारे, विनायक कोकितकर, दिपकसिंग नगरकर, सागर भोसले, दत्तूसिंग नगरकर, पंकज देसूरकर, ओंकार बिडीकर, श्रेयस बिडीकर आदी उपस्थित होते.


Recent Comments