येडियुरप्पा यांच्यामुळेच कल्याण कर्नाटक प्रदेशाचा विकास झाला. या प्रदेशावर येडियुरप्पा यांचा खास जीव आहे. कल्याण कर्नाटक आणि मोदी यांचेही एक आगळे नाते आहे. कल्याण कर्नाटकाच्या मुक्ती दिनादिवशीच मोदी यांचा जन्मदिन येतो असे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सांगितले.

७४व्या कल्याण कर्नाटक उत्सवानिमित्त मुख्यमंत्री बोम्मई यांनी कलबुर्गीच्या डीआर परेड मैदानात शुक्रवारी सकाळी राष्ट्रध्वजारोहण केले. त्यानंतर सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. फ्लो
त्यानंतर बोलताना कल्याण कर्नाटकाच्या विकास निगमला कायमस्वरूपी विशेष सचिव नेमण्यात येईल अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. त्यासाठी कलबुर्गी येथे स्वतंत्र कक्ष सुरु करण्यात येईल. थोडा वेळ द्या, या भागाचा आमूलाग्र विकास करून दाखवतो. कल्याण कर्नाटक रिजन डेव्हलपमेंट बोर्डला दिलेला निधी खर्च करून विकास करून दाखवा, आणखी १५०० कोटी रुपये निधी देऊ असे ते म्हणाले. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या इच्छाशक्तीमुळे कल्याण कर्नाटकाला स्वातंत्र्य मिळाले. विकासासाठी या प्रदेशाला कलम ३७१-जे नुसार विशेष दर्जा देण्यात आला आहे. कर्नाटकात आज ३० लाख लोकांना लस देण्यात येणार आहे असे त्यांनी सांगितले. बाईट
यावेळी मंत्री मुरुगेश निराणी, मुनिरत्न, कल्याण कर्नाटक विकास मंडळाचे अध्यक्ष आ. दत्तात्रय पाटील-रायपूर, आ. राजकुमार पाटील-तेलकूर, एम. वाय. पाटील, बसवराज मत्तिमोड, खा. डॉ. उमेश जाधव आदी उपस्थित होते.


Recent Comments