बेळगावातील खडेबाजारमधील राजेंद्र कॉम्प्लेक्समधील मधू नाईक अँड सन्स येथे जगप्रसिद्ध एसीलॉर कंपनीची ऑप्टिकल लेन्स आता उपलब्ध झाली आहे.

एसीलॉर ही नेत्रोपकरणांच्या निर्मितीतील एक आघाडीची कंपनी असून जगभरातील ७.७ बिलीयन ग्राहकांना अचूक, निर्दोष नेत्रसेवा देण्यात कार्यरत आहे. कंपनीचे जगातील ७० देशांत ६९ हजार वर्कफोर्स आहेत. कंपनीच्या ऑप्टिकल लेन्स अनावरणप्रसंगी कंपनीचे कर्नाटक क्लस्टर हेड मनोज बालकृष्णन, मार्केटिंग रिजनल हेड विजय, एरिया मॅनेजर गुरुराज एच. प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यांच्याहस्ते अत्याधुनिक तंत्रज्ञानाधारित लेन्सचे अनावरण करण्यात आले. मधू नाईक अँड सन्सचे संचालक सुनील नाईक यांनी स्वागत केले. वरुण नाईक यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी दिलीप नाईक, मनोज टेंगशे, टायगर पटेल, कार्तिक शहा, कोल्हापुरे, संजय नाईक आदी उपस्थित होते.


Recent Comments